महाभारताचे ‘शकुनी मामा’ पडद्याआड, अभिनेते गुफी पेंटल यांचं निधन

0

 

 

मुंबई- महाभारतात शकुनीची भूमिका साकारणारे अभिनेते गुफी पेंटल यांचे आज सोमवारी सकाळी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. पेंटल गेल्या अनेक दिवसांपासून अंधेरी येथील रुग्णालयात दाखल होते. त्यांचा सहकलाकार सुरेंद्र पाल यांनी अभिनेत्याच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गुफी यांची तब्येत बिघडली तेव्हा ते फरिदाबादला होते. त्यांना प्रथम फरिदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर मुंबईत आणण्यात आले होते.