महाविकास आघाडीचं ठरलं, मुंबईत शिवसेना मोठा भाऊ, कोणाच्या वाट्याला किती जागा?

0
महाविकास आघाडीचं ठरलं, मुंबईत शिवसेना मोठा भाऊ
महाविकास आघाडीचं ठरलं, मुंबईत शिवसेना मोठा भाऊ

 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्या मैदानात उतरल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा कायम होता. अखेर महाविकास आघाडीत मुंबईतील जागांवर तोडगा निघाला आहे. मुंबईत उद्धव ठाकरेंची  शिवसेना मोठा भाऊ असणार आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना सर्वात जास्त जागा लढणार आहे. तर त्यानंतर काँग्रेस पक्षाने देखील बऱ्याच जागा खेचून आणल्या आहेत.

महाविकास आघाडीमध्ये मुंबईतील जागावाटप शेवटच्या दिवशी फायनल

महाविकास आघाडीतील मुंबईतील जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आलाय. 22-10-3-1 हा असणार महाविकास आघाडीचा मुंबईतील अंतिम फॉर्म्यला असणार आहे. मुंबईत शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीमध्ये  सर्वाधिक जागा लढवणारा पक्ष ठरणार आहे. मुंबईत 36 पैकी 22 जागा उद्धव ठाकरेंची शिवसेना लढणार आहे. काँग्रेसने दिलेल्या 18 जागांच्या प्रस्तावापैकी  काँग्रेस फक्त 10 जागा मुंबईत लढवणार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्ष तीन जागा लढवणार आहे. मुंबईत समाजवादी पक्षासाठी  शिवाजीनगर मानखुर्ची जागा महाविकास आघाडीत देण्यात आली आहे. काँग्रेस पक्ष विदर्भात अधिक जागा लढवत असल्याने, मुंबई ताकद असलेले सर्वाधिक मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाने आपल्याकडे घेतले आहेत.

मुंबईत उद्धव ठाकरेंची शिवसेना कोणत्या जागा लढणार?

1.मागाठाणे – उदेश पाटेकर
2. विक्रोळी – सुनील राऊत
3. भांडूप पश्चिम – रमेश कोरगावकर
4. जोगेश्वरी पूर्व – अनंत (बाळा) नर
5. दिंडोशी – सुनील प्रभू
6. गोरेगांव – समीर देसाई
7. अंधेरी पूर्व – ऋतुजा लटके
8.चेंबूर – प्रकाश फातर्पेकर
9. कुर्ला (अजा) – प्रविणा मोरजकर
10. कलीना – संजय पोतनीस
11. वांद्रे पूर्व – वरुण सरदेसाई
12. माहिम – महेश सावंत
13. वरळी – आदित्य ठाकरे
14. वडाळा -श्रद्धा जाधव
15. शिवडी- अजय चौधरी
16. भायखळा- मनोज जामसुतकर
17. वर्सोवा – हरुन खान
18. घाटकोपर पश्चिम – संजय भालेराव
19. विलेपार्ले – संदिप नाईक
20. दहिसर – विनोद घोसाळकर
21. मलबार हिल -भैरूलाल चौधरी जैन
22. बोरिवली  – संजय भोसले

मुंबईत काँग्रेस कोणत्या जागा लढणार?

23.कुलाबा – हिरा देवसी
24.अंधेरी पश्चिम -अशोक जाधव
25. सायन कोळीवाडा -गणेश यादव
26.चारकोप -यशवंत सिंग
27. कांदिवली पूर्व -कालू बढेलिया
28.मुंबादेवी – अमीन पटेल
29.धारावी -ज्योती गायकवाड
30.चांदीवली -नसीम खान
31.मालाड पश्चिम – असलम शेख
32.वांद्रे पश्चिम – असिफ झकारीया

 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षमुंबईत 3 जागा लढणार

33.घाटकोपर पूर्व – राखी जाधव
34.अणुशक्ती नगर – फहाद अहमद
35. मुलुंड – संगीता वाझे

समाजवादी पक्ष

36. शिवाजीनगर मानखुर्द – अबू आझमी