

नागपूर -नागपूरचे प्रख्यात साहित्यिक मधुप पांडेय यांचे आज निधन झाले.विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त केली. केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शोकसंवेदना देताना म्हटले आहे की, मधुप पांडेय यांचे निधनाचे वृत्त दु:खद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. देश-विदेशांतील कवी संमेलनांमध्ये सहभागी होत पांडेय सरांनी आपल्या सादरीकरणाने मोठा चाहता वर्ग निर्माण केला. त्यांचे साहित्य अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्यांचा विद्यार्थी असताना मलाही त्यांच्या साहित्याचा आनंद घेता आला.