

रत्नागिरी(Ratnagiri), 7 मे, : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांमध्ये आज सुरू असलेल्या निवडणुकीत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात पहिल्या चार तासांमध्ये सर्वांत कमी मतदानाची नोंद झाली आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत आणि भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात थेट लढत आहे. मतदारसंघात नऊ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. त्याकरिता आज सकाळी सात वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली, पण सुरुवातीपासूनच रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात कमी मतदानाची नोंद झाली आहे.
पहिल्या दोन तासांत रत्नागिरी सर्वांत कमी म्हणजे अवघे सहा टक्के मतदान झाले होते, तर त्याचवेळी चिपळूण विधानसभा मतदारसंघात दहा टक्क्यांहून अधिक मतदान नोंदविले गेले. अकरा वाजेपर्यंतच्या चार तासांच्या आकडेवारीनुसार रत्नागिरी वगळता अन्य पाच मतदारसंघांमध्ये २० टक्क्यांहून अधिक मतदान झाले. रत्नागिरीत केवळ २५ टक्के मतदान नोंदविले गेले. चिपळूणमध्ये सर्वाधिक म्हणजे २४.१८%, त्याखालोखाल राजापूरमध्ये २३.६३%, कणकवली मतदारसंघात २२.०९% सावंतवाडीत २१.७४%, कुडाळमध्ये २१.४०% तर रत्नागिरीत केवळ १५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.संपूर्ण रत्नागिरी श-सिंधुदुर्ग मतदारसंघात पहिल्या चार तासांमध्ये २१.१९% मतदान झाले आहे.