
मुंबई : “अजित पवार भावी मुख्यमंत्री आहेत म्हणजे ते फार दिवस भावी राहणार नाहीत. मलाही राजकारण माहिती आहे. काय घडामोडी घडत आहेत, ते मलाही माहिती आहे. मग त्या घडामोडी कायदेशीर असतील, घटनात्मक असतील अथवा राजकीय असतील. परंतु अजित पवार हे भविष्यातले मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचं हे भविष्य लवकर-लवकर जवळ येत आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्री होतील यात शंका नाही”, अशी टिप्पणी खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut on Ajit Pawar)यांनी केली आहे.
राऊत म्हणाले, मी याआधीही सांगितले आहे की, महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळेल. अजित पवार यांच्या वाढदिवसाला असे काही होर्डिंग्स लागलेत की नाही, ते मला माहिती नाही. परंतु ते लवकरच मुख्यमंत्री होतील, हे सत्य आहे आणि हे सत्य आता शिंदे गटाने स्वीकारलं पाहिजे, असा टोलाही खासदार राऊत यांनी लगावला.