

Gadachiroli : येथे नवनिर्वाचित खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार व जनतेचे आभार मानण्यासाठी भेट देऊन आपल्या भाषणात प्रचलित राजकीय सामाजिक व आर्थिक स्थितीची जाणीव करून देऊन लोकसभा निवडणुकीत मोलाचे योगदान देऊन सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. खासदार डॉ.नामदेव किरसान त्यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .
यावेळी जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विश्वजीत कोवासे, जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती सेल रजनीकांत मोटघरे, तालुका अध्यक्ष वसंत पाटील राऊत, नदीम नाथांनी, गौरव येनप्रेड्डीवार, मनोहर नवघडे सरपंच ग्रामपंचायत नगरी सौ.भूमिका बारसागडे, सौ.योगिता वाकडे, अजय म्हशाखत्री, मोरे साहेब बांबोळे, राहुल म्हशाखत्री, सत्यशील खोब्रागडे, रामटेकेजी पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.