

नागपूर (Nagpur) : नागपूर सार्वत्रिक लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी आज तीन अर्ज दाखल करण्यात आले. आतापर्यंत एकंदर पाच अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी आज एक अर्ज दाखल करण्यात आला.
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तारखा जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात 20 एप्रिल रोजी अर्ज दाखल करण्यात आले. नागपूर लोकसभा मतदारसंघात पहिल्या दिवशी 1 दाखल अर्ज केला. नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी आज नारायण चौधरी (सोशलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया, कम्युनिस्ट) , साहिल तुरकर (अपक्ष) आणि दीपक मस्के (बहुजन महापार्टी) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर रामटेकसाठी प्रमोद खोब्रागडे (आंबेडकराईट पार्टी आफ इंडिया) यांनी अर्ज दाखल केला. रामटेकसाठी आज १०४ अर्जांची तर नागपूरसाठी १३१ अर्जांची विक्री करण्यात आल्याने प्रत्यक्षात नामांकन अर्ज वाढणार का, अशी चिन्हे आहेत. नामनिर्देशनपत्रे सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त 27 मार्चपर्यंत सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत सादर करता येतील. 28 मार्च रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार आहे.३० मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.