धापेवाडामध्ये लोककला सेवा मंडळाचा राष्ट्रीय गायन मेळावा

0

विदर्भातील कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडामध्ये लोककला सेवा मंडळ ऑल इंडिया तालुका कळमेश्वर शाखा यांच्यावतीने आयोजित लोककलावंतांच्या राष्ट्रीय गायन मेळावा यशस्वीरित्या पार पडला.

या कार्यक्रमात तब्बल 300 हून अधिक भजन मंडळांनी सहभाग घेतला आणि आपल्या मधुर भजनांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लोक कला सेवा मंडळ ऑल इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य राजकुमार घुले यांनी भूषवले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन रुक्मिणी देवस्थान ट्रस्टी रवीभाऊ पवार विठ्ठल, धापेवाड्याच्या सरपंच मंगलाताई राजेश शेटे, उपसरपंच मंगेश भाऊ माले, तसेच राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्वेताताई रहांगडाले या मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून केले. भाजप नेते राजीव पोतदार यांनीही कार्यक्रमात हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमात ग्रामीण भागातून आलेल्या अनेक महिला आणि पुरुष भजन मंडळांनी विविध भजने सादर केली. विविध लोककला प्रकारांचे प्रदर्शन यावेळी करण्यात आले.. भजनांसोबतच, लोकनृत्य आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचाही कार्यक्रमात समावेश होता. हा मेळावा ग्रामीण भागातील लोककला आणि संस्कृती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न होता आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून श्वेताताई रांगडाले,  राष्ट्रीय कोषाध्यक्ष दर्शनाताई घुले , राष्ट्रीय सचिव शाहीर ,मनोहर धनगरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष व्यंकटजी गजबे राष्ट्रीय सचिव शाहीर ,माणिकराव देशमुख ,राष्ट्रीय उपाध्यक्ष मंजुषा बनकर ,राष्ट्रीय सदस्य माननीय श्री सुभाष तगाडे ,राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख प्रमोद बागडे ,राष्ट्रीय कार्याध्यक्ष वासुदेव वाकोडे, राष्ट्रीय सदस्य ज्ञानेश्वर गावंडे ,राष्ट्रीय सदस्य अरुणा डहाके, राष्ट्रीय सदस्य मनीष भिवगडे ,केंद्रीय अध्यक्ष विदर्भ शाहीर कलाकार ,अलंकारजी टेंभुर्णी विदर्भ शाही परिषद कार्याध्यक्ष अरुण वाहिनी सरचिटणीस विदर्भ शाहीर कलाकार, सुभाष जी मानवतकर, विदर्भसंजीव बालाजी सुवर्णकार महाराष्ट्र अध्यक्ष जयश्री कवटकर, महाराष्ट्र अध्यक्ष गौरीशंकर गजभिये ,महासचिव महाराष्ट्र सुनीता काळे, महाराष्ट्र महासचिव पुरुषोत्तम डांगोरे ,महाराष्ट्र सचिव सुनिता कवडे, महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष प्रमोद गुलांडे, विदर्भ अध्यक्ष प्रमिला वाकोडे विदर्भ म. अध्यक्ष श्री सुनीलभाऊ चौधरी ,विदर्भ महासचिव सुनीलभाऊ दहाट ,विदर्भ उपाध्यक्ष चित्रा गुडदे, विदर्भ उपाध्यक्ष सचिन दादा कडू ,नागपूर जिल्हा अध्यक्ष सौ पदमा मुसळे, जिल्हा अध्यक्ष महिला किशोर भाई दे ,जिल्हा उपाध्यक्ष ईश्वर मानकर, जिल्हा उपाध्यक्ष मारुती केजी, जिल्हा महासचिव ईश्वर बालपांडे ,जिल्हा सचिव प्रशांत निंबाळकर ,जिल्हा संघटक नामदेव ठाकरे ,जिल्हा संघटक शाहीर बन्सीधर कोटेकर ,जिल्हा सचिव कविता यादव, नागपूर जिल्हा सल्लागार अंबिका महाजन, नागपूर जिल्हा सदस्य शाहीर विद्याधर, सरदार नागपूर शहर सचिव पुष्पा आढळकर, नागपूर जिल्हा महासचिव ग्रामीण निर्मलाताई माहूकर ,जिल्हा सदस्य ग्रा पुरुषोत्तम कुंभे ,तालुका अध्यक्ष कळमेश्वर राजु टापरे ,नरखेड तालुका अध्यक्ष मीनाताई धरमाडी, तालुका अध्यक्ष कळमेश्वर महिला जयश्री धोटे, नरखेड तालुकाध्यक्ष कविताताई चौधरी ,सावनेर तालुका अध्यक्ष जयश्री बेदरकर ,तालुका महासचिव कळमेश्वर मधुकर ठाकरे ,अध्यक्ष ज्ञानेश्वर निंबाळकर तालुका सचिव कळमेश्वर प्रतिभा करंडभाजणे ,कामठी तालुका महिला अध्यक्ष काशिनाथ मेश्राम ,कुही तालुका अध्यक्ष मारुती मुसळे ,सावनेर तालुका अध्यक्ष शाहीर भगवान वानखेडे, उमरेड वि. प्रमुख विद्याताई चापले ,कुही ता. महिला अध्यक्ष विलास बोबडे ,ता. अध्यक्ष हिंगणा संगीता दिघोरी ,उमरेड तालुका अध्यक्ष रंगनाथ बोरीकर ,महाराज उमरेड तालुका अध्यक्ष माधुरी घोरमाडे, हिंगणा तालुका अध्यक्ष गोपाल भिसे, काटोल तालुका अध्यक्ष यमुना परोडिया काटोल तालुका महिला अध्यक्ष दिगंबर मासुरकर ,उपाध्यक्ष नागपूर ग्रामीण वैशाली खडसे, तालुका महिला अध्यक्ष नागपूर ग्रामीण दिलीप भास्कर ,तालुकाध्यक्ष नागपूर ग्रामीण पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली तथा कार्यक्रमाचे आयोजन श्री राजू भोईर, सुनील दहाट ,ज्ञानेश्वर गावंडे, किशोर भायदे, ईश्वर मानकर, देविदास हत्ती यांनी केले राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार घुले यांनी संबोधन केले.