

42 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
गोंदिया (Gondia) :- जिल्ह्यातील आमगाव परिसरात घरफोडी करणारे सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्या कडून सोन्या- चांदीचे दागिने व रोख रक्कम असा किंमती 42 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
धर्मेद्र मनिराम मडामी (29, रा. मक्कीटोला, पो.ठाणा, ता.आमगाव) असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून मुन्नालाल भैय्यालाल ठाकरे (64, रा. मक्कीटोला सुरकुडा) यांच्या घरून चोरलेले दागिणे व रोख रक्कम मिळाले. फिर्यादी हे दि. २५ जुलै २०२४ ला सकाळी दहा ते साडेबारा वाजेच्या दरम्यान शेतावर गवत आणण्यास गेले होते.
तसेच त्यांची पत्नी व मुलगा हे सुद्धा बाहेर गेले होते. घरी कोणीही हजर नसताना आरोपीने त्यांचे राहते घराचे समोरील दरवाज्याचा कुलुप व घरातील लोखंडी आलमारीचा दार तोडून आलमारीतील सोन्या- चांदीचे दागिने, व रोख रक्कम असा किंमती 42 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. फिर्यादीच्या तक्रारीवरुन आमगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्धात गुन्हा दाखल केला.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे, पथक आमगाव परिसरातगुन्ह्यातील अज्ञात चोरटे -गुन्हेगारांचा शोध व सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गुरूवार गुप्त बातमीदारा कडून मिळालेल्या खात्रीशिर माहितीच्या आधारे संशयित गुन्हेगार नामे – धर्मेद्र मनिराम मडामी यास ताब्यात घेतले. या घरफोडी गुन्ह्याचे अनुषंगाने कसून चौकशी केली असता संशयिताने प्रथमतः उडवा उडवीची उत्तरे दिले. त्यास पोलिसी खाक्या दाखवत पुन्हा विश्वासात घेवून कसून सखोल विचारपुस चौकशी केली असता नमूद घरफोडी गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीकडून गुन्हातील चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे.आरोपीस पुढील कायदेशीर कारवाई व तपासाकरीता आमगाव पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलि स अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु. शा. चे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि. महेश विघ्णे, मपोउपनि वनिता सायकर, पोलिस अंमलदार पो.हवा विठ्ठल ठाकरे, इंद्रजित बीसेन, पो.शि. हंसराज भांडारकर, चा.पो.हवा लक्ष्मण बंजार यांनी केली.