या दिवशी मिळणार नाही दारू!

0
assorted-color bottle lot on shelf

चंद्रपूर  –  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ ही खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीत जिल्ह्यात सर्व ठोक व किरकोळ मद्य विक्रीची दुकाने चार दिवस बंद राहणार आहेत. १८ नोव्हेंबरच्या सायंकाळी ६ वाजेपासून १९ व २० नोव्हेंबरचा संपूर्ण दिवस तसेच मतमोजणीचा २३ नोव्हेंबर रोजी संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद ठेवावी, असा आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी बुधवारी दिला आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. या कार्यक्रमानुसार महाराष्ट्र राज्यात विधानसभेच्या सर्व जागांसाठी बुधवार, दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतमोजणी शनिवारी (दि. २३) होणार आहे. ही दुकाने बंद राहतील

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व ठोक व किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्या नमुना (सीएल-२, सीएल-३, सीएल, एफएल, टिओडी-३ एफएल-१, एफएल-२ एफएल-३ एफएल-४. २ एफएल/सीआर-२, टिंडी-१ (ताडी) इत्यादी सर्व प्रकारच्या अनुज्ञप्त्या पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्याऱ्यांनी दिले आहेत. • नमूद कालावधीत आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकांविरूद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अन्वये कहक कारवाई करण्यात येईल तसेच ते धारण करीत असलेली अनुज्ञप्ती निलंबित अथवा रद्द करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असेही आदेशात नमूद आहे. या आदेशाचे सर्व परवाना धारकांनी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

बँकांतील संशयास्पद व्यवहारांवरही करडी नजर

निवडणूक काळात बँकांतील संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर दक्षता आयोगाने करडी नजर ठेवली आहे. आयोगाला वित्तीय गुप्तवातों शाखेकडून (एफआययू। याबाबत माहिती मिळण्यास सुरुवात झाली आहे. एफआययूच्या अहवालामुळे संगनमताने होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर लगाम लावण्यास मदत मिळणार आहे.

लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ च्या कलम १३५ (सी) च्या तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र देशी दारू नियम १९७३ नियम २६ (१) (सी) (१) महाराष्ट्र विदेशी मद्य (सेल ऑन कॅश, रजिस्टर ऑफ सेल्स इ.) नियम १९६९ मधील नियम ९ ए (२) (सी) (१) तसेच विशेष परवाने व अनुज्ञप्ती नियम १९९२ चे नियम ५ (१०) (वी) (सी) (१) व महाराष्ट्र ताडी दुकाने (अनुज्ञप्ती) आणि ताडी झाडे (छेदाणे) नियम ५ (अ) (२) नुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मुक्त व निर्भय वातावरणात पार पडणे बंधनकारक आहे. त्यासाठीच जिल्ह्यातील सहाही विधानसभा क्षेत्रातील निवडणूक कालावधीत ठोक व किरकोळ महा विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे.