

लाॅयन्स क्लब ऑफ नागपूरच्या वतीने डॉक्टर डे आणि जागतिक सीए दिनानिमित्त उपक्रम
नागपूर(Nagpur) |लाॅयन्स क्लब ऑफ नागपूरच्या वतीने डॉक्टर डे आणि जागतिक सीए दिनानिमित्त नागपुरातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सेवाभावी डॉक्टर आणि चार्टर्ड अकाउंटंट्सचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
डॉक्टर डे च्या औचित्याने, रुग्णसेवा आणि सामाजिक कार्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या नागपुरातील निवडक डॉक्टरांचा विशेष सत्कार करण्यात आला. यात सेव्हन स्टार हॉस्पिटलचे डॉ. सचिन माकडे, इंडियन नॅचरोपॅथी क्लिनिकचे डॉ. रवींद्र वनमोरे, डॉ. निकीता वाघमारे, डॉ. दिव्यांनी भगत, वोक्हार्ट हॉस्पिटलचे डॉ. स्वरूप वर्मा यांचा सत्कार करण्यात आला.
जागतिक सीए दिनानिमित्त, समाजकार्य, प्रामाणिक सेवा व आर्थिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत चार्टर्ड अकाउंटंट्सचा सन्मान करण्यात आला. यात सीए प्रदीप रामविलास मोदाणी, सीए ओमप्रकाश अग्रवाल, सीए राकेश वासवाणी यांचा सत्कार करण्यात आला.
या सर्व मान्यवरांच्या कार्यालयात जाऊन त्यांना प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमावेळी लाॅयन्स क्लब ऑफ नागपूरचे रिजन चेअरपर्सन डॉ. किरण मोहता, झोन चेअरपर्सन नितीन वर्मा, अध्यक्ष निधीश सावरकर, सचिव गुरसिमरन कौर नागरा, कोषाध्यक्ष रवी किशनपुरीया, विनोद पुरनचंद गुप्ता, सतीश जेजानी, विघ्नेश बिलसे, विनोद जमनाप्रसाद गुप्ता, सागर शिवहरे, नीलिमा सावरकर, पार्थ सावरकर आदी मान्यवर उपस्थित होते.