सीटी हायस्कूल येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम

0

 

चंद्रपूर (Chandrapur) दि. 22:- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सीटी हायर सेकंडरी स्कूल, सिटी कन्या विद्यालय व हिन्दी सिटी हायर सेकंडरी स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृध्दी भिष्म यांच्या मार्गदर्शनाखाली सिटी हायस्कूल चंद्रपूर येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमात मुख्य न्यायदंडाधिकारी पी.पी. कुलकर्णी यांनी पोक्सो कायद्याबाबत मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे अॅड. महेन्द्र असरेट यांनी प्राधिकरणाच्या विविध योजना व विधी सहाय्याबाबत माहिती दिली. याप्रसंगी केअर क्लबच्या सदस्या व शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सानिका तिवारी, आचल नैताम, अर्चिता टिकेदार व सनिग्धा भक्ते यांनी विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला चांदा शिक्षण मंडळाच्या (Chanda Education Board) सहसचिव वसुधा रायपुरे, सिटी हायर सेकंडरी स्कूलच्या मुख्याध्यापिका अॅनेट लाल, सिटी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतिमा नायडू व हिन्दी सिटी हायर सेकंडरी स्कूलच्या मुख्याध्यापिका कविता मिश्रा प्रामुख्याने उपस्थित होत्या.

कार्यकमाचे संचालन मंजुषा घागी यांनी तर आभार शितल तायवाडे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिक्षक, शिक्षिका कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.