‘एनआरसी’ विषयावर धर्मयोद्धा डॉ.सुरेश चव्हाणके यांचे व्याख्यान

0
'एनआरसी' विषयावर धर्मयोद्धा डॉ.सुरेश चव्हाणके यांचे व्याख्यान
lecture-by-religious-warrior-dr-suresh-chavanke-on-nrc

मोठ्या संख्येत उपस्थित राहण्याचे हिंदू समन्वय परिषदेचे आवाहन

 

नागपूर (Nagpur) 4 सप्टेंबर 2024 :-  देशात नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स (एनआरसी) ​अर्थात भारतीय नागरिकांची नोंदणीची चर्चा सर्वत्र सुरू आहे. अशात जनता एनआरसीचे महत्व अधोरेखित करण्यासाठी आणि देशावासियांचे प्रबोधन करण्याकरिता हिंदू समन्वयन परिषदेचे मुख्य समन्वयक, धर्मयोद्धा डॉ.सुरेशजी चव्हाणके यांच्या विशेष व्याख्याण्याचे आयोजन करण्यात आले आहे.आज,गुरूवारी, दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी, शहरातील गीता मंदिर येथील भागवत भवनात दुपारी 2 वाजता या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बांगलादेश मधील शेख हसीना सरकार पायउतार झाल्यानंतर या ​देशात अभूतपूर्व संकट उभे झाले आहे. बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार सुरू आहे. हे अत्याचार थांबवण्याची मागणी करीत सर्वच स्तरातून हिंदू बांधवानी आ​क्रोश मोर्चे काढत त्यांचा संताप व्यक्त केला.महाराष्ट्रासह देशातील विविध ठिकाणी आंदोलने, निर्देशने करण्यात आली.पंरतु, बांगलादेशातील हिंदू अद्यापही सुरक्षित नाही, ही खंत देशवासियांमध्ये आहे. ​हिंदू बांधवांच्या रक्षणासाठी देशवासिय सर्वच स्तरातून मदत करीत आहेत, हे विशेष.

पंरतु, सर्वत्र हिंदूंवर अत्याचारांची मालिका सुरू असतांना, आणि देशात बांगलादेशी घुसखोरांची समस्या भेडसावत असतांना देशतील ही मुख्य समस्या ​भविष्यात किती गंभीर रुप घेवू शकते आणि आपल्याला आता काय भूमिका स्वीकारावा लागेल, यासंदर्भातील मार्गदर्शन महत्वाचे आहे. या मार्गदर्शानातून देशतील हिंदू आणि देशातील जुने मुस्लिम यांचा समन्वयाचे महत्व अधोरेखित होईल.अशात मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन हिंदू समन्वय परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

Nagpur is famous for
www.nagpur.gov.in 2024
NMC Nagpur property tax receipt
Nagpur which state
Index number for property tax Nagpur
Nagpur in which state in Map
Nagpur map
Property tax NMC Nagpur