काटोलात झळकले “जनतेच्या मनातील नेते”

0

काटोल(Katol) :– नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे, दरम्यान विविध पक्षातील मोठ्या नेत्यांनी त्यांच्या त्यांच्या मतदार संघातील दावेदारी दाखवत आहे, अनिल देशमुख यांच्या विरोधात भाजपतील 5 उमेदवारीचा दावा करतांना दिसत आहे, भाजपा नेते ओबीसी महामंडळाचे माजी अधक्ष राज्यमंत्री दर्जा तसेच देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या जवळीक असणारे अविनाश ठाकरे(Avinash Thackeray) यांच्या वाढदिवसानिमित्त  काटोल येथे बॅनर झळकले ” जनतेच्या मनातील नेते ” अशा प्रकारचे बॅनर लागले आहे, यावरून अविनाश ठाकरे देखील काटोल मतदार संघात आपली उमेदवारी मिळू शकेल अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.

पुढील दोन-तीन महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर आतापासूनच इच्छुक नेते तयारीला लागले आहेत. उमेदवारी मिळवण्यासाठी विविध उपक्रम आणि कार्यक्रम देखील आयोजित केले जात आहेत अशातच भाजपचे अविनाश ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त काटोल मध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी झाली. यात जनतेच्या मनातील नेते हे बॅनर झळकल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.