बनावट प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या वकीलास बीडमधून अटक

0

 

यवतमाळ : पोलिस भरती प्रक्रियेत एका उमेदवाराने बनावट प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र जोडून नोकरी बळकाविण्याचा प्रयत्न केला. पोलिस प्रशासनाने केलेल्या तपासणीत बीड येथे सदर प्रमाणपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले. या प्रमाणपत्रावर बनावट स्वाक्षरी करणार्‍या वकीलास बीडमधून अटक करण्यात आली.पांडुरंग रामभाऊ ढलपे (रा. बीड), असे अटक करण्यात आलेल्या तिसर्‍या आरोपीचे नाव असून, तो व्यवसायाने वकील आहे. यापूर्वी किशोर किसन तोरकड (रा. बोरीवन, ता. उमरखेड), नवनाथ शहाजी कदम (रा. बार्शी, जि. सोलापूर) यांना अटक करण्यात आली होती. प्रकल्पग्रस्ताच्या प्रमाणपत्रावर बनावट स्वाक्षरी करणार्‍या वकीलास अटक करण्यात आली. त्याला न्यायालयाने 11 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास दराटी पोलिस करीत आहेत.