सॉफ्टसेन्‍सच्‍या ‘सायबरशक्ती’ मोहिमेचा शुभारंभ

0

राही पब्लिक स्कूलसोबत झाला पहिला करार

नागपूर (Nagpur) 3 ऑगस्ट:- सायबर सुरक्षेबाबत महिला, विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने सॉफ्टसेन्‍स टेक्नोसर्व इंडिया प्रा. लि. (एसटीआयपीएल) तर्फे ‘सायबरशक्ती’ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला असून या उपक्रमांतर्गत पहिला करार राही पब्लिक स्कूलसोबत करण्यात आला आहे.

या उपक्रमांतर्गत शाळा-महाविद्यालयांमध्ये सायबर सुरक्षेवरील जनजागृती सत्रं, सायबर लॅब भेटी, आणि विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहे. विशेषतः विद्यार्थिनी व कार्यरत महिलांना सायबर सुरक्षेच्या दृष्टीने सशक्त करण्यावर या मोहिमेद्वारे उपक्रमाचा भर दिला जाणार आहे.

या प्रसंगी एसटीआयपीएलचे संस्थापक व सीईओ, सायबर तज्‍ज्ञ डॉ. विशाल लिचडे व राही पब्लिक स्‍कूलच्‍या प्राचार्या गुरप्रीत कौर यांनी करारावर स्‍वाक्षरी केली. रा‍ही पब्लिक स्‍कूलच्‍या संचालिका सुधा विजय राऊत, सचिव नरेश वासू, मंजुषा जोशी आणि सायबर फोरेंसिक तज्ञ सूरज पवार यावेळी उपस्थित होते.

सायबरशक्ती (Cyber Crim) हा केवळ एक टप्पा नसून सुरक्षित डिजिटल समाज निर्माण करण्याचे एक मिशन आहे. या प्रकल्‍पामध्‍ये सायबर सुरक्षा तज्‍ज्ञ, सायबर मानसशास्त्रज्ञ, पत्रकार, सायबर ऑडिटर आणि सायबर सुरक्षा विषयाचे विद्यार्थी सहभागी असून सायबर धोक्यापासून कसे सुरक्षित राहावे, इथपासून ते धोका झाल्यास त्यातून बाहेर कसे पडायचे यासंदर्भात मार्गदर्शन करतात, अशी माहिती डॉ. विशाल लिचडे दिली. गुरप्रीत कौर यांनी शाळेला ‘सायबर सुरक्षित’ शाळा म्‍हणून नावारुपाला आणण्‍यास या करारामुळे मदत होईल, असे सांगितले.