

– डॉ. वेदप्रकाश मिश्रा ( Dr. Vedprakash Mishra)
महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा नागपूर विभागात हिंदी शिक्षक प्रशिक्षण शिबिर संपन्न
नागपूर (nagpur), 3 ऑगस्ट
विविधतेने नटलेल्या या भारतातील विविध प्रांताना एकत्र आणण्याचे महत्वाचे कार्य हिंदी भाषेने केले असू ही भाषा विविधतेला जोडणारा दुवा आहे, असे प्रतिपादन कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्सेस चे प्रमुख सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले.
महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे संचलित नागपूर विभागीय केंद्रातील हिंदी शिक्षक प्रशिक्षण शिबिरात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. शिबिराच्या उद्घाटन सत्राला राष्ट्रभाषा सभा नागपूरचे अध्यक्ष ॲड. भास्कर पाटील, राष्ट्रभाषा सभा पुणेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम पगारे, सचिव रविकिरण गळंगे, सहसचिव श्रीपाद भोंग, तसेच राष्ट्रभाषा सभा नागपूरच्या सचिव डॉ. सुनीता मुंजे यांची उपस्थिती होती. हिंदी कादंबरीकार मुन्शी प्रेमचंदजींच्या प्रतिमेला जयंतीनिमित्त माल्यार्पण करण्यात आले.
हिंदी भाषेची उपयुक्तता आणि आजच्या काळातील महत्व यावर डॉ. मिश्रा यांनी प्रकाश टाकला. दुस-या सत्रात विविध हिंदी विषयाशी संबंधित परीक्षांची माहिती रविकिरण गळंगे यांनी दिली. पुरुषोत्तम पगारे यांनी, हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा व्हावी आणि नवीन शिक्षण पद्धतीत हिंदी विषयावर अन्याय होऊ नये यासाठी सर्व हिंदी शिक्षकांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. समारोपीय सत्रात राष्ट्रभाषा हिंदीच्या संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या नागपूरच्या विविध मुख्याध्यापक, प्रचारक, हिंदी परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणा-या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. भास्कर पाटील यांनी अध्यक्षीय समारोप केला. रोहिणी कुंभार, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद शिबिराच्या यशस्वीतेसाठी महत्वाचे योगदान दिले. सूत्रसंचालन राजेश परमार यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. सुनीता मुंजे (Dr. Sunita Munje)यांनी केले.