भर पावसात लहुजी शक्ती सेनचे ठिय्या आंदोलन

0

 

(Amravti)अमरावती – अमरावतीच्या स्थानिक गर्ल्स हायस्कूल चौकातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या बॅनरचे फलक अज्ञात व्यक्तीने तोडले. या घटनेविषयी (Lahuji Shakti Sena)लहुजी शक्ती सेनेने गाडगे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अण्णाभाऊ साठे यांचे अनुयायी चांगलेच आक्रमक झाले. आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी, या मागणीसाठी अनुयायांचे भर पावसात गर्ल्स हायस्कूल चौकात ठिय्या आंदोलन सुरू आहे. गर्ल्स हायस्कूल चौकातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या जागेचा वाद न्यायालयात आहे. याठिकाणी त्यांच्या अनुयायांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे बॅनर लावले होते.