वाहनाच्या धडकेने मजुराचा मृत्यू

0

 

(Nagpur)नागपूर -सावनेर – पांढुर्णा महामार्गावर खुर्सापार शिवारात पायदळ जाणा-या मजुराचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मुत्यू झाला. सुखराम रामलाल उईके(वय ३० वर्षै) रा. खेडी, तहसिल,मुलताई जिल्हा बैतूल मध्यप्रदेश, हा अंकुर कंपनी माळेगांव(जोगा) येथे मजुरीच्या कामावर होता.महामार्गावर पायदळ चालत असतांना वाहनाने धडक दिली. तो बेशुध्द अवस्थेत रोडच्या कडेला पडुन होता.

घटनेची माहिती केळवद पोलिसांनी घटनास्थळ गाठले व सामाजिक कार्यकर्ते हितेश बंसोड यांच्या एंबुलंसने सावनेर शासकीय रुग्णालयात मध्ये जखमीला आणले असता डॉक्टरने सुखरामला मृत घोषीत केले.मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला. पुढील तपास केळवद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रशांत केसरे,व शिपाई मंगेश धारपुरे करीत आहेत.