राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून एल. बी.एस कॉलेजच्या शिरीष ननावरे यांची निवड

0

 

सातारा  SATARA – लालबहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा  Lal Bahadur Shastri College Satara येथील राष्ट्रीय खेळाडू व क्रीडा विभाग प्रशिक्षक श्री. शिरीष ननावरे यांची क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यातर्फे नाडियाड- गुजरात Nadiad- Gujarat येथे होणाऱ्या राष्ट्रीय आर्चरी स्पर्धेच्या महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षक पदी निवड झाली आहे.

शिरीष ननावरे हा लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असून राष्ट्रीय आर्चरी खेळाडू आहे. सध्या क्रीडा प्रशिक्षक म्हणून लालबहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा येथे ते कार्यरत आहेत. लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातील विद्यार्थी खेळात उत्तम कामगिरी करत आहेतच त्यासोबत महाविद्यालयातील प्राध्यापक व प्रशिक्षक यांनी देखील आपल्या कामगिरीने महाविदयालयचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकवले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य आर. व्ही. शेजवळ, उपप्राचार्य डॉ. सी. पी. माने सर, जिमखाना विभाग प्रमुख मेजर मोहन वीरकर सर, ज्युनिअर विभाग स्टाफ सेक्रेटरी केदार सर, सहप्रमुख हांगे सर व इतर मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.

त्याचबरोबर श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे, सेक्रेटरी प्राचार्या शुभांगी गावडे मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी मा.कौस्तुभ गावडे यांनी शिरीष ननावरे यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.