

(Nagpur) नागपूर – जिल्हा परिषदेच्या परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राला काळे फासल्या प्रकरणी (State Youth Congress President Kunal Raut)प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांना अखेर रविवारी पोलिसांनी अटक केली. रातुम विद्यापीठ परिसरात स्वातंत्रवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे दहन प्रकरणही भाजप, भाजयुमोने गांभीर्याने घेतले. युवक काँग्रेसने हा दडपशाहीचा प्रकार असल्याचा निषेध केला. शनिवारी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेत काँग्रेसचे नेते,माजी मंत्री रोखे घोटाळा प्रकरणी शिक्षा झालेले सुनील केदार यांच्या छायाचित्रावरून बजेटची होळी करणाऱ्या भाजप सदस्यांच्या अपात्रतेचा प्रस्ताव सत्तारूढ पक्षाने पारित केला. दुसऱ्या दिवशी प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी जिल्हा परिषद परिसरातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळे फासले.
सोमवार 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा परिषद कार्यालय
(मुख्य प्रवेश व्दाराजवळ)भाजपतर्फे आंदोलन केले जाणार आहे. काळे फासणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अटकेची मागणी पत्रपरिषदेत (BJP District President Sudhakarrao Kohle)भाजपा जिल्हाध्यक्ष सुधाकरराव कोहळे, महानगर अध्यक्ष (Bunty Kukade) बंटी कुकडे यांनी केली. अखेर गृहमंत्री (Devendra Fadnavis)देवेंद्र फडणवीस यांच्या गृहजिल्ह्यात पोलिसांनी तातडीने ही कारवाई केली.