रेल्वे विस्कळीत होण्यामागे हे कारण ठरलं कारणीभूत

0

अनेक गाड्या रद्द, काहींचे मार्ग बदलले

रत्नागिरी (Ratnagiri), 10 जुलै  कोकण रेल्वे मार्गावर गोव्यातील पेडणे येथील बोगद्यात अतिवृष्टीमुळे पाणी शिरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळित झाली आहे. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या अन्य मार्गाने वळविण्यात आल्या आहेत.

पेडणे येथील बोगद्यात काल दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पाणी भरले. काही काळाने ते ओसरले, मात्र पुन्हा रात्री सव्वादहा वाजता पाणी भरले. तेही ओसरले. पण पुन्हा आज पहाटे तीन वाजता पाणी भरल्याने हा मार्ग बंद पडला. अशा स्थितीत कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळित झाली आहे. काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या पुणेमार्गे वळविण्यात आल्या आहेत.

आज सुटणाऱ्या पण रद्द करण्यात आलेल्या गाड्या अशा – मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस (Mumbai-Margaon Vande Bharat Express), जनशताब्दी एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, मुंबई-मंगलोर एक्स्प्रेस, मडगाव-चंदीगड एक्स्प्रेस, मंगलोर-एलटीटी एक्स्प्रेस, मंगलोर-मुंबई एक्स्प्रेस, सावंतवाडी-मडगाव पॅसेंजर, मडगाव-मुंबई मांडवी एक्स्प्रेस, मडगाव-सावंतवाडी पॅसेंजर, मडगाव-मुंबई तेजस एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, सावंतवाडी-दिवा पॅसेंजरयाशिवाय उत्तर भारतातून येणाऱ्या अनेक गाड्या कोकण रेल्वेमार्गावरील सावंतवाडीपर्यंतच्या विविध स्थानकांवरून मागे वळवून पनवेल पुणे मार्गे रवाना करण्यात आल्या आहेत. उत्तरेतून येताना पनवेलपर्यंत आलेल्या गाड्याही कोकण रेल्वेमार्गाऐवजी पुणे मार्गे मडगावकडे वळविण्यात आल्या आहेत. दक्षिण भारतातून येणाऱ्या गाड्याही विविध स्थानकांवरून कर्नाटकातून लोंढा मिरज पुणे मार्गे पनवेलकडे वळविण्यात आल्या असून त्या उत्तर भारतात रवाने होणार आहेत.