जाणून घ्या जुलै महिन्यातील वैशिष्टय आणि घटना

0

 

(Juily Month)जुलै महिना…. पावसाचा….. आषाढी वारीचा… श्रावण सरींचा….. चिंब भिजण्याचा….. वर्षातील सातवा महिना. १२ जुलै ज्युलियस सीझर यांचा जन्मदिवस. ते रोमन सेनापती आणि राजकारणी होते. ज्युलियस सीझरची हत्या इ. स. पूर्व 44 मध्ये झाली. त्यांच्या सन्मानार्थ कॅलेंडरच्या सातव्या महिन्याचे नाव जुलै ठेवण्यात आले.
चला मग, या महिन्यातील वैशिष्टय, घटना आणि सण उत्सव, जाणून घेऊया.

१ जुलै हा दिवस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जयंतीदिन. यानिमित्त कृषी दिन (Agriculture Day)म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. १ जुलै ते ७ जुलै हा आठवडा कृषी सप्ताह म्हणून साजरा केला जातो. सर्वांना मान्सूनची प्रतीक्षा आहे. शेतीची कामे देखील पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

1 जुलै हा दिवस डॉक्टर्स डे (Doctor’s Day)म्हणून देखील साजरा केला जातो. प्रख्यात राजकारणी, स्वातंत्र्य सेनानी आणि वकील, डॉक्टर, बिधानचंद्र रॉय यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. केंद्र सरकारच्या या महत्त्वपूर्ण कर सुधारणांच्या अंमलबजावणीचा उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी 1 जुलै रोजी (GST Day)GST दिवस साजरा केला जातो. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भारतात जीएसटीची स्थापना करण्याचे श्रेय दिले जाते. त्यांना ‘भारतातील जीएसटीचे जनक’ म्हणून संबोधले जाते. याच दिवशी 1 जुलै रोजी (Institute of Chartered Accountants of India)इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त CA दिवस साजरा केला जातो. यामहिन्यात 11 जुलै हा दिवस लोकसंख्या दिवस (Population Day)आहे.

जुलै महिन्यातील 17 जुलै हा फार महत्वाचा दिवस आहे. भक्ति, समभाव आणि समानतेचा संदेश देणारा सण आषाढी एकादशी सण आहे. यानिमित्त राज्यभरातील वारकरी पंढरीच्या दिशेनं निघाले आहेत. चंद्रभागेच्या तीरी भक्तीचा मेळा भरणार आहे. याच दिवशी मोहरम सण आहे. विदर्भात मोहरम सण हिंदू आणि मुस्लिम बांधव सामूहिकरित्या साजरा करतात. 21 जुलै ला गुरुपौर्णिमा आणि 23 पासून श्रावण सोमवार ला सुरुवात होणार आहे. त्यामुळं हा महिना पावसाचा….. आषाढी वारीचा… श्रावण सरींचा….. आहे.

सध्या हाराष्ट्रात पावसाळी अधिवेशन सुरु आहे. १४ व्या विधानसभेचं हे शेवटचं अधिवेशन आहे. या अधिवेशनामधील अनेक योजनांची 1 जुलैपासून अंमलबजावी केली जाणार आहे. राज्य सरकारकडून सिलेंडरबाबत मोठा निर्णय घेतला आहे. प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन सिलिंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली. पर्यावरण संरक्षणाला ही योजना सहाय्यभूत ठरेल. 52 लाख 16 हजार 412 लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येईल.

 

जाणून घ्या जुलै महिन्यातील वैशिष्टय आणि घटना | Shankhnaad News #shankhnaadnews #live

राज्य सरकार 25 लाख महिलांना लखपती दिदी बनवणार आहेत. राज्यात 10 हजार पिंक रिक्षा महिलांसाठी देण्यात येतील. ⁠नवीन रुग्नवाहिका खरेदी केल्या जातील. ⁠⁠बचत गटाच्या निधीत 15 हजारांहून 30 हजार रुपयांची वाढ केली जाईल. व्यावसायिक शिक्षणामध्ये आठ लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्या मुलींना शंभर टक्के सवलत दिली जाणार आहे. मत्स्य बाजार स्थापना केले जाणार आहे. बांबूची लागवड केली जाईल जाईल. ⁠महाराष्ट्र सिंचन सुधारणा प्रकल्प हाती घेतला जाणार, अशा घोषणा देखील कऱण्यात आल्या.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ अंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. 1 जुलैपासून या योजनेची अंमलबजावी केली जाणार आहे. या योजना अंर्तगत लाभार्थी महिलांना 1500 रुपये प्रति माह दिले जाण्याची शक्यता आहे. कमीतकमी 3.50 कोटी महिलांना फायदा होण्याची आशा आहे.