

नागपूर : नंदनवन हद्दीत आज सकाळीच दगडाने ठेचून हत्या केलेला एक तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली. तातडीने उपनिरीक्षक आडे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. नंदनवन पोलीस स्टेशन अंतर्गत हिवरी नगर ते संघर्ष नगर रोड वर दारू भट्टीच्या समोर अज्ञात तरुणाची दगडाने ठेचून ही हत्या करण्यात आल्याचे आणि ही घटना मध्यरात्री झाल्याची प्राथमिक माहिती आहे मिळाली.ऑगस्ट महिन्याचा पहिल्याच दिवशी हत्या झाल्याने पुन्हा एकदा नागपूर हादरले. गेल्या आठवड्यात चार हत्या एकाच दिवशी झाल्या. पोलीस तपासात मृतकाचे नाव तुषार किशोर इंगळे (18), रा.गुजर नगर, गंगाबाई घाट असे असल्याचे पुढे आले. हत्या कुणी व कशासाठी केली याचा मागोवा पोलीस घेत आहेत.
Related posts:
सेवानिवृत्त शिक्षकांचे समस्यांचा आ.अडबाले यांनी घेतला आढावा
October 17, 2025Breaking news
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धा जिल्हाध्यक्षपदी अतुल वांदिले यांची नियुक्ती
October 15, 2025Social
१६ ऑक्टोबरला सार्वजनिक सुट्टी द्या-खासदार प्रतिभा धानोरकर यांची आक्रमक मागणी
October 13, 2025Breaking news