

सोलापूर(Solapur) , 12 मे १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला गोडीगुलाबीनं लग्न करण्याचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले. आईच्या लक्षात येताच ठाण्यात धाव घेतल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास जारी करुन त्याला अटक करण्यात आली . आज सकाळी ७ ते दुपारी ३:३० च्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. अजय मल्लय्या स्वामी (वय-१९, रा. भारतरत्न इंदिरानगर, बेडर समाज मंदिराजवळ सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादीची १७ वर्षाच्या मुलीला नमूद आरोपीने ती अल्पवयीन असल्याची माहिती असूनही त्याने आज सकाळी ७ ते दुपारी ३:३० च्या दरम्यान, लग्न करण्याचे आमिष दाखवून तिला पळवून नेले.
फिर्यादीला मुलगी दिसेना म्हणून शोधाशोध केली मात्र ती मिळून न आल्याने तातडीने जेलरोड पोलीस ठाण्यात धाव घेतली. तक्रार नोंदवली. अधिकाऱ्यांनी जबाब नोंदवून घेऊन शोधाशोध सुरु केली. २४ तासाच्या आत आरोपीला पकडण्यात यश आले. त्याला कोर्टात उभे करुन पोलिस कोठडी मागण्यात आली. मात्र न्यायालयाकडून न्यायालयीन कोठडीत ठेवण्याच आदेश दिला.