खालिस्तानी दहशतवादी गोळीबारात ठार

0

टोरंटो-खालिस्तानी चळवळीला खतपाणी घालणारा व भारताच्या वॉंटेड यादीत असलेला कुख्यात खालिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याची कॅनडात गोळ्या घालून ठार करण्यात आल्याचे आढळून आले आहे. कॅनडातील सरे येथे गुरु नानक सिंग गुरुद्वारामध्ये दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी निज्जर याला गोळ्या झाडून ठार केले. (Khalistani terrorist Hardeep Singh Nijjar shot dead in Canada) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निज्जर हा कॅनडातील शीख फॉर जस्टिस (एसएफजे) तसेच खलिस्तानी टायगर फोर्सचा नेता होता आणि तो कॅनडात बसून भारताविरुद्ध देशविरोधी कारवाया करत होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी ही घटना घडली, त्या गुरुद्वाराचा निज्जर हा प्रमुखही होता. तो शीख फॉर जस्टिस (SFJ) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याच्याही तो जवळचा होता. सप्टेंबर 2020 मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने निज्जरला दहशतवादी घोषित केले होते. यानंतर निज्जरची जालंधरच्या भरसिंग पुरा गावातील मालमत्ताही जप्त करण्यात आली. निज्जरने याच गावातील पुजाऱ्याची हत्या केली होती. याद्वारे तो पंजाबमध्ये धार्मिक उन्माद पसरवण्याचा प्रयत्न करत होता. एनआयएने निज्जरवर १० लाखांचे बक्षीसही जाहीर केले होते, अशी माहिती आहे.