

विदर्भ साहित्य संघात गुरुवारी
वैदर्भीय कवितेवरील ग्रंथाचे प्रकाशन
विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दीनिमित्ताने संस्थेने घोषित केलेल्या प्रकल्पांपैकी विदर्भातील कवितेचा मागोवा घेणारा ग्रंथ सिद्ध झाला आहे. ‘कविता डॉट कॉम-विदर्भकवितेचे नवे युग` या ग्रंथाचे संपादन ज्येष्ठ कवयित्री मनीषा अतुल यांनी केले आहे. या ग्रंथाचे प्रकाशन गुरुवार दि. 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.00 वाजता विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुलातील ‘अमेय दालनात` होईल.
विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभात आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे (भा.प्र.से.) यांचे हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होईल. अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे हे प्रमुख अतिथी असून रा.तु.म.नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे ग्रंथावर भाष्य करतील. साहित्य रसिक नागरिकांनी या कार्यक्रमास अगत्यपूर्वक उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेने केले आहे.