

उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान येणार
(Washim)वाशिम- अयोध्येत श्री राम मंदिराची उद्घाटन तारीख निश्चित झाल्यानंतर बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी इथे देशाचे (Prime Minister Narendra Modi)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित दौरा होणार आहे. अशी माहिती जितेंद्र महाराज यांनी दिली आहे.
पोहरादेवी येथील नंगारा भवन वास्तू उद्घाटनाकरिता आणि राज्य सरकारने दिलेल्या 593 कोटीच्या निधी संदर्भात झालेल्या विकास कामाची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहरादेवीत येणार आहेत. पंतप्रधान यांचा दौरा कसा असेल? कोण-कोण येणार आहे? यासंदर्भात (Mahant Jitendra Maharaj of Pohardevi)पोहरदेवीचे महंत जितेंद्र महाराज यांनी लवकरच माहिती दिली जाईल असेही स्पष्ट केले.