

: हाऊसफुल्ल गर्दीत रंगली संगीत संध्या
कैलाश खेर (Kailash Kher) यांनी श्री गणेशाला वंदन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. जय श्री राम ही राम धून सादर करीत अजी मैं तो भजू राम ही राम
आदी श्री राम भक्तीची गीते सादर करून वातावरण राममय केले. जय जय कारा, शिव चले, चंचल मन, भोले चले भोले चले आदी भगवान शिवाची गाणी सादर करून मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांची मने जिंकली.
या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपसथिती होती. गडकरी हे प्रेरक आहेत. जनसेवा हा गडकरी यांनी आपल्या जगण्याचे मंत्र बनवला आहे, असे म्हणत कैलाश खेर यांनी गडकरी यांचे आवडते गीत अगडबम बम लहरी हे गीत सादर केले.
: नितीन गडकरी यांनी लावली उपस्थिती
तेरी दिवानी या गाण्याची कहानी सांगताना कैलाश खेर म्हणाले, अल्बमसाठी मुंबईला आले होते. खूप नकार पचवले. मुंबईत पहिला कन्सर्ट होता. सोबत मोठे गायक होते. आधीच उंची कमी त्यात बसून गात होतो. पण नंतर उभा राहिलो. लहानपणापासून योगाचार्य असल्यामुळे एक पाय उंच करून गायला लागलो. लोकांना ही स्टाईल खूप आवडली आणि एक्स्टेंपो गायलेले तेरी दिवानी हे गाणे हिट झाले आणि कैलाश खेर जन्माला आला.
त्यानंतर आज मेरे पिया घर आयेंगे आदी गाणी सादर करून कैलाश खेर यांनी कार्यक्रमांत रंग भरले.