न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती अमरावती आणि नागपूर दौऱ्यावर

0

 

नागपूर – मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जातीच्या पात्र व्यक्तींना राज्यात सक्षम अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी मराठवाड्याच्या धर्तीवर इतरत्र विशेष कक्ष स्थापन केले आहे. या कक्षाला अधिक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश निवृत्त न्यायमूर्ती तथा गठित समितीचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिले आहे. याच पार्श्वभूमीवर कुणबी मराठा जात प्रमाणपत्र समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती आज बुधवार दि. 22 नोव्हेंबरपासून दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहे. या दौऱ्यामध्ये अमरावती येथील विभागीय कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन कुणबी नोंदी तपासल्या जाणार आहेत. त्यानंतर दिनांक 23 नोव्हेंबरला पुन्हा नागपुरात प्रमाणपत्रांच्या वाटपाबाबत बैठक घेण्यात येणार आहे.
आज अमरावती विभागिय आयुक्त कार्यालयात समितीचे अध्यक्ष संदीप शिंदेसह पथक दाखल झाले आहेत. या ठिकाणी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा व अकोला या पाचही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी उपस्थित आहे. अमरावतीत कुणबी-मराठा, मराठा कुणबी अशी नोंदच सापडली नाही तर अमरावती जिल्ह्यात कुणबी क्षत्रिय मराठा व मराठा अशा स्वतंत्र नोंदी सापडल्या आहेत.