जसे नाव तसे गाव चिखली गावाची दयनीय अवस्था

0
जसे नाव तसे गाव चिखली गावाची दयनीय अवस्था
just-like-the-name-the-village-is-muddy-the-village-is-in-a-miserable-condition

 

राजुरा (Rajura) :- राजुरा विधानसभेतील जिवती तालुक्यातील चिखली गावाचे छायाचित्रात दिसणारे हे वास्तव आहे. मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित गावाचे नाव चिखली आहे आणि गावाच्या नावाप्रमाणेच गावातील मुख्य रस्त्यावर प्रवेशद्वारासमोरच संपूर्ण रस्ता चिखलमय आहे. त्यावरून दळणवळण करण्यास गावकऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे. दुचाकीस्वार ,पायी जाणारे चिखलामुळे घसरून पडत आहे. छोटे- मोठे अपघात होऊन गावकरी दुखापतग्रस्त होत आहे. अगदी रस्त्याला लागूनच जिल्हा परिषद शाळा असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना त्या चिखलातून पाय भरवत शाळेत जावे लागत आहे.

स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर देखील राजुरा विधानसभेतील अनेक गाव ठोस मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहे. साधे पिण्याचे शुद्ध पाणी देखील गावकऱ्यांना मिळत नाही. आरोग्य व्यवस्था, शिक्षण व्यवस्था ,ग्रामपंचायत एकूण कारभार ढेपाडलेला आहे. मनसे नगरसेवक सचिन भोयर राजुरा विधानसभेच्या दौऱ्यावर असताना त्यांनी चिखली गावाचे वास्तव्य दयनीय परिस्थिती गावकऱ्यांचे हाल सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून उघड केले व सदर संबंधित रस्त्यावरील चिखल साफ करून चिखली गावाचा रस्ता दडणवळणास योग्य करा अशा सूचना संबंधित ग्रामसेवक व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहे. यावेळी मनसे कामगार सेनेचे चिटणीस नितीन भोयर, जिवती तालुकाध्यक्ष शेख हकानी, कोरपणा तालुकाध्यक्ष सुरेश कांबळे, गडचांदूर शहर उपाध्यक्ष राजू गर्गेलवार, अक्षय भांदक्कर, मंगेश चौधरी, गोपाल गायवनकर आदी उपस्थीत होते.

Rajura to nagpur distance
Rajura distance
Rajura tourist places
Rajura temple
Rajura MLA list
Rajura Taluka map
Rajura Vidhan Sabha Voter list
Rajura Assembly constituency