14 जून जागतिक रक्तदाता दिन

0

जागतिक रक्तदान दिनाचा इतिहास –

जागतिक आरोग्य संघटनेने 2005 पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. जागतिक आरोग्य संघटना, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेड क्रॉस आणि रेड क्रिसेंट सोसायटीज यांच्या संयुक्त पुढाकाराने 2005 मध्ये पहिल्यांदा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेव्हापासून दरवर्षी 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो. हा दिवस कार्ल लँडस्टेनरच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो.

कार्ल लँडस्टेनर हे तेच शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी जगाला रक्तगट प्रणालीची जाणीव करून दिली. कार्ल लँडस्टेनर यांना रक्तगट शोधल्याबद्दल 1930 मध्ये नोबेल पारितोषिकही मिळाले होते. लँडस्टेनर हे मानवाचे ए, बी, एबी आणि ओ या गटांमध्ये वर्गीकरण करणारे पहिले व्यक्ती होते. त्यांच्या कार्याने रक्त संक्रमणामध्ये क्रांती घडवून आणली आणि समान रक्तगटाच्या लोकांमध्ये रक्त संक्रमणाची पद्धत सुरू झाली.

 

मेडिकल क्षेत्रात आपले अमुल्य योगदान दिलेल्या कार्ल लँण्डस्टायनर यांच्या स्मरणार्थ दर वर्षी जागतिक पातळीवर रक्तदाता दिवस साजरा केला जातो.थोर शास्त्रज्ञ कार्ल लँडस्टायनर यांचा आँस्ट्रेलिया ह्या देशात झाला होता.1937 सगळयात पहिले रक्तगटाचा शोधही कार्ल लँडस्टायनर यांनीच लावला होता.यानंतरच रक्ताचे वेगवेगळया गृपमध्ये वर्गीकरण करण्यास सुरूवात झाली.याने लाखो लोकांचे प्राण वाचवण्यास मदत होऊ लागली कार्ल लँडस्टायनर यांनी चिकित्सा क्षेत्रामध्ये दिलेल्या त्यांच्या अमुल्य योगदानासाठी त्यांना एक विशेष पदवी बहाल करण्यात आली होती.जिचे नाव फादर आँफ ट्रान्सफ्युझन मेडिसिन असे होते.

विज्ञान क्षेत्रात देखील कार्ल लँण्डस्टायनर यांनी अनेक महत्वाची कार्ये करत आपले अमुल्य योगदान दिले ज्याचे परिणामस्वरूप त्यांना फिजिओलाँजी आणि मेडिसिन क्षेत्रातील अत्यंत मानाचा मानला जात असलेला नोबेल पुरस्कार देखील बहाल करण्यात आला.अशा ह्या महान शास्त्रज्ञाच्या मृत्यु 1943 मध्ये वयाच्या 75 व्या वर्षी झाला होता.तेव्हापासुन कार्ल लँडस्टायनर यांच्या आठवणीत दरवर्षी हा रक्तदाता दिन साजरा केला जातो.

जगात सगळयात पहिले रक्तदाता दिन 2005 मध्ये साजरा केला गेला होता.आणि याला जागतिक आरोग्य संघटनेने आपले समर्थन देखील दिले होते.दरवर्षी जागतिक स्तरावर 14 जुन रोजी रक्तदाता दिवस हा साजरा केला जात असतो.भारतात या दिवशी एखाद्या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.या दिवशी लोकांना रक्तदानाचे महत्व गरज पटवून देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.रक्तदानाविषयी सामाजिक जागृती निर्माण होण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात.

जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) दरवर्षी 14 जून हा जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला (World Blood Donor Day 2022) जातो. या वर्षी मेक्सिको त्यांच्या राष्ट्रीय रक्त केंद्राद्वारे जागतिक रक्तदाता दिन 2022 चे आयोजन करणार आहे. हा जागतिक कार्यक्रम 14 जून 2022 रोजी मेक्सिको सिटी येथे होणार आहे. रक्त आणि रक्त उत्पादनांचे ट्रांसफ्यूजन दरवर्षी लाखो जीव वाचवण्यास मदत करतात. रक्तदान अशा रुग्णांसाठी वरदान ठरतं, ज्यांचं जीवन एखाद्या गंभीर आजारामुळे धोक्यात आहे. योग्य वेळी रक्त मिळाल्यास अनेक लोकांचा किमती जीव वाचू शकतो.

याव्यतिरिक्त, रक्ताचा उपयोग गुतांगुतीचे आजार, जटिल वैद्यकीय शस्त्रक्रिया यामध्ये गरजेचे असते. सुरक्षित आणि पुरेशा रक्त उपलब्ध असेल प्रसूतीदरम्यान आणि नंतर गंभीर रक्तस्त्राव झाल्यामुळे मृत्यू आणि अपंगत्वाचे प्रमाण कमी करण्यासही गरजेचे असते.

जागतिक रक्तदान दिनाचे महत्व –

जागतिक रक्तदाता दिनाचे उद्दिष्ट सुरक्षित रक्त आणि रक्त उत्पादनांच्या गरजेबद्दल जागतिक जागरूकता वाढवणे हा आहे. हा दिवस ऐच्छिक रक्तदात्यांनी त्यांचे किमती रक्तदान केल्याने त्यांचे आभार मानण्याचा एक प्रसंग असतो.

जागतिक रक्तदान दिन 2023 ची थीम –

दरवर्षी जागतिक रक्तदान दिनानिमित्त वेगळी थीम ठेवली जाते. या वर्षीची थीम आहे, ”रक्तदान हे एकतेचे कार्य आहे. प्रयत्नात सामील व्हा आणि जीव वाचवा.” (Donating blood is an act of solidarity. Join the effort and save lives) म्हणजेच रक्तदान हे एकतेचे कार्य आहे. प्रयत्नात सामील होऊन आपण काही लोकांचे जीव वाचवू शकतो. समाजामध्ये ऐच्छिक रक्तदान वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.