
सरसंघचालकांनी व्यक्त केला आनंद
नागपूर – “नॅडेपकाका या नावाने विख्यात पुसदचे गांधीवादी अर्थतज्ज्ञ ना.दे.पांढरीपांडे यांनी गाईच्या शेणापासून तयार केलेल्या नॅडेपकाका गो-दर्शन धूप या उत्पादनाला भारत सरकारने पेटंट देऊन सन्मानित केले, हा आपल्या सर्वांसाठीच अभिमानाचा विषय आहे,” अशी भावना रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केली आहे.
नॅडेपकाकांचे ज्येष्ठ पुत्र, ज्येष्ठ पत्रकार आणि या धूपाचे पेटंटधारक सोपान पांढरीपांडे यांनी शुक्रवारी सकाळी संघ मुख्यालयात जाऊन हे धूप सरसंघचालकांना भेट दिले, तेव्हा ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख यावेळी उपस्थित होते. या धूपातील घटकद्रव्यांची सरसंघचालकांनी आस्थेने चौकशी केली आणि पेटंटची कागदपत्रे वाचून समाधान व्यक्त केले.
“घराच्या खोलीत यज्ञकर्म सहजतेने करता येईल असा हा धूप तयार करण्यासाठी स्वत: नॅडेपकाकांनीच संशोधन सुरू केले होते. त्यांचे अपूर्ण कार्य आम्ही (मी आणि माझा भाऊ अविनाश) पूर्ण केल्यावर 2018 मध्ये पेटंटसाठी अर्ज केला आणि 6 वर्षानंतर यावर्षी जानेवारीत पेटंट मिळाले. गोमयापासून निर्मित  कोणत्याही धूपाला प्राप्त झालेले हे पहिलेच भारतीय पेटंट आहे,” अशी माहिती सोपान पांढरीपांडे यांनी यावेळी सरसंघचालकांना दिली.
घरच्या घरी यज्ञकर्म, प्रदूषणमुक्ती आणि कीटकांना पिटाळून लावणे या तीनही मुद्यांवरचे आमचे संशोधनात्मक दावे पेटंट नियंत्रकांनी मान्य केले आहेत, याकडे त्यांनी सरसंघचालकांचे लक्ष वेधले. या धूपात गोमयासह पंचगव्य, हवन सामग्री, नवग्रह समिधा आदी ३५ वैदिक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. या संशोधनाला चार वर्षांचा कालावधी लागला.
गेल्या पिढीतील गांधीवादी तत्त्वचिंतक नॅडेपकाका हे गाईच्या अर्थशास्त्राचे तज्ज्ञ मानले जातात. त्यांनी तयार केलेले कम्पोस्ट खत आज नाबार्डच्या सहाय्याने देशभर उत्पादित केले जाते. देवलापारच्या गोविज्ञान संस्थेच्या उभारणीतही त्यांचा मोलाचा वाटा होता. रा.स्व. संघाने १९९७ साली त्यांना गाईच्या अर्थशास्त्राबद्दल मा.स.गोळवलकर पुरस्कारही दिला होता, हे येथे उल्लेखनीय आहे.
Related posts:
भाजप महिला आघाडी मध्य नागपूर तर्फे महिलांसाठी भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन 30 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर...
October 30, 2025LOCAL NEWS
सड़क सुरक्षा को बढ़ावा देने के लिए ‘जनआक्रोश’ की ‘गांधीगीरी’
October 30, 2025LOCAL NEWS
नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘शिववैभव किल्ले स्पर्धे’चा भव्य शुभारंभ
October 30, 2025LOCAL NEWS
















