

नागपूर (Nagpur)
नवी दिल्ली येथे दिनांक 24 ते 26 एप्रिल 2025 दरम्यान होणार्या राष्ट्रीय स्तरावरील प्लंबिंग परिषदेत आधुनिक प्लंबिंग साहित्य प्रदर्शन सहभागी करण्यासाठी महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन तर्फे प्रतिनिधी म्हणून विदर्भ प्रमुख व प्लंबीग इंजिनिअर आणि कन्सल्टन्ट जीवन राजूरकर व महाराष्ट्र प्लंबीग असोसिएशनचे नागपूर जिल्हा व शहर सल्लागार व जेष्ठ कॉन्ट्रॅक्टर राजेंद्र पाल यांची निवड करण्यात आली आहे.
या परिषदेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्लंबिंग क्षेत्रात काम करणारे लोक उंच इमारती मध्ये प्लंबिंग कामातून ‘जल बचत’ या विषयावर त्यांचे शोधनिबंध सादर करणार आहेत. नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी असलेले शहर सध्या वेगाने विकसित होते आहे. विकासाची गती बघता नागपूर शहरातील इमारतीची उंची लवकरच 150 मीटर असेल. भविष्यात नागपूर शहरात निर्माण होणार्या उंच इमारती मध्ये उत्तम दर्जाचे प्लंबिंग काम व्हावे, या उद्देशाने महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन तर्फे यंदा नागपूरमधील प्रतिनिधींना ही संधी देण्यात आली आहे.