जेसीआय चंद्रपूरचा मानवतेसाठी उपक्रम – १०० दिवसांचा मच्छरदाणी वितरण प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण

0

चंद्रपूर : जेसीआय चंद्रपूरने मानवतेसाठी केलेला भव्य “डासजाळी वितरण प्रकल्प” आज यशस्वीरीत्या पूर्ण झाला. तब्बल १०० दिवस अखंडपणे सुरू असलेल्या या उपक्रमातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथील नवजात बालकांना डासजाळीचे वितरण करण्यात आले.

हा प्रकल्प जेसीआय चंद्रपूरचे अध्यक्ष जेसी चेतन रामटेके यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आला. अध्यक्ष म्हणून शपथ घेताना दिलेल्या वचनानुसार त्यांनी मानवतेसाठी एक अद्वितीय प्रकल्प पूर्ण करून दाखविला आणि जेसीआय चंद्रपूरला नव्या उंचीवर नेले.

आज या प्रकल्पाचा समारोप समारंभ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे सर यांच्या हस्ते संपन्न झाला. डॉ. दीप्ती श्रीरामे मॅडम यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. या प्रकल्पात इन्चार्ज सिस्टर प्राजक्ता जरोंकर आणि कमल पोहणे यांचे विशेष सहकार्य लाभले.

या प्रसंगी पूर्व झोन अध्यक्ष डॉ. सुशील मुंधळा, माजी अध्यक्ष दामोदर सारडा, श्यामसुंदर धोपटे, उमेश चांडक, अभिषेक कंशटिया, बंटी डगली आदी मान्यवर उपस्थित होते. प्रकल्पाचे मार्गदर्शन माजी अध्यक्ष निसार शेख यांनी केले.

या प्रकल्पात सचिव संकेत पिंपळकर, मिलिंद उमाटे, काजल कुकरेजा, नितेश कुकरेजा, धीरज राठी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

या प्रकल्पामुळे जेसीआय चंद्रपूरच्या कार्याची दखल संपूर्ण शहराने घेतली असून सर्वत्र अध्यक्ष जेसी चेतन रामटेके यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

या प्रसंगी अध्यक्ष जेसी चेतन रामटेके यांनी आपल्या अध्यक्षीय कार्यकाळाची सांगता जाहीर करताना सांगितले की,

> “जेसीआय चंद्रपूरने मानवतेसाठी कार्य करताना मिळविलेलं हे यश ही सर्व सदस्यांची एकजूट आणि सेवाभावाची फळं आहेत. मला अभिमान वाटतो की आपण मिळून समाजासाठी काहीतरी अर्थपूर्ण दिलं.”

या भव्य उपक्रमामुळे जेसीआय चंद्रपूर ने समाजसेवेचा नवा आदर्श निर्माण केला आहे.