Jasprit Bumrah : वेगवान गोलंदाज पुनरागमनासाठी सज्ज

0

Jasprit Bumrah: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहला पाठिच्या दुखापतीने ग्रासलं होतं. शेवटच्या सामन्यात त्याला पाठदुखीचा त्रास जाणवला आणि त्याला आरामाचा सल्ला दिला गेला. इतकंच काय तर त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीलाही मुकला. असं असताना जसप्रीत बुमराह एनसीएमध्ये देखरेखीखाली ट्रेनिंग करत होता. आता तो पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे.

जसप्रीत बुमराह हा भारतीय गोलंदाजीतील प्रमुख अस्त्र आहे. पण दुखापतीमुळे टीम इंडियात आत बाहेर असतो. वर्षभर संघातून बाहेर गेल्यानंतर जसप्रीत बुमराहने कमबॅक केलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा त्याला पाठदुखीचा त्रास जाणवू लागला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील शेवटच्या सामन्यात त्याला पाठदुखीचा त्रास जाणवू लागला. आधी इंग्लंडविरुद्धची मालिका आणि त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही मुकला.

जसप्रीत बुमराहची दुखापत पाहता त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळायचं की नाही हा प्रश्न निवड समितीवर सोडला होता. खरं तर त्याला अधिक विश्रांतीची आवश्यकता होती. त्यामुळे त्याची निवड संघात करण्याऐवजी त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला गेला.

जसप्रीत बुमराहने आता बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये वैद्यकीय देखरेखीखाली फिटनेस प्रशिक्षण सुरु केलं आहे. यॉर्कर स्पेशालिस्ट येत्या आयपीएलमध्ये पुन्हा मैदानात उतरेल हे निश्चित आहे. याचा अर्थ असा की बुमराह 23 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात पुनरागमन करेल.

जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी उपलब्ध नसल्याने, त्याच्या जागी युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाला स्थान देण्यात आले आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात राणाने उत्कृष्ट कामगिरी करत 7.4 षटकांत 31 धावा देत 3 बळी घेतले.

23 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यात मोहम्मद शमी आणि हर्षित राणा टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजी युनिटचे नेतृत्व करतील असे म्हणता येईल. हार्दिक पांड्या तिसऱ्या वेगवान गोलंदाजाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच अर्शदीप सिंगला खेळाडूंच्या संघात स्थान दिले जाईल की नाही हे प्लेइंग 11 जाहीर झाल्यावर स्पष्ट होईल.