

प्रियदर्शनी पार्क मुंबई येथे दि. १ व २ मार्च रोजी झालेल्या राज्यस्तरीय ओपन युथ स्पर्धेत हिंदू मुलींची शाळा व कनिष्ठ महाविद्यालय महाल नागपूर येथील कु. जान्हवी हिरुडकर हिला १८ वर्षाखालील मुलींच्या गटात १००० मी. धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला. हे अंतर जान्हवी ने २.५८.०० मिनिटांचा वेळ घेत पूर्ण केले.
या कामगिरीच्या आधारावर तिची दि. १० ते १२ मार्च या कालावधीत पटना येथे होणाऱ्या 20 व्या राष्ट्रीय युथ स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. जान्हवी शाळेचे क्रीडा शिक्षक श्री अशपाक शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली सतत सराव करीत असते जान्हवीच्या या यशाबद्दल स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री रवींद्र फडणवीस सर व अध्यक्षांच्या प्रतिनिधी सौ सीमा फडणवीस मॅडम यांनी कौतुक केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ माया बमनोटे मॅडम तसेच उपमुख्याध्यापक श्री सुबोध आष्टीकर सर व पर्यवेक्षक राहुल बोबडे सर यांनी अभिनंदन करून जान्हवीच्या पुढील वाटचाली करता शुभेच्छा दिल्या.