टॅक्सी दरीत कोसळून १० जण ठार

0

 

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर 

श्रीनगर (Srinagar), २९ मार्च : जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री कॅब टॅक्सी दरीत कोसळून १० जणांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस, राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि रामबनचे नागरी जलद प्रतिसाद पथक घटनास्थळी दाखल झाले.

गुरुवारी मध्यरात्री १.१५ वाजताच्या सुमारास एक टॅक्सी (तवेरा) राष्ट्रीय महामार्ग-४४ वर बॅटरी चष्माजवळ सुमारे ३०० मीटर दरीत कोसळल्याची माहिती प्रशासकीय यंत्रणेला मिळाली. यात कॅबमधून प्रवास करणाऱ्या १० प्रवाशांचा मृत्यू झाला. घटनास्थळी पहाटेपासून बचावकार्य सुरू करण्यात आले. दरम्यान १० जणांचे मृतदेह दरीतून बाहेर काढले आहेत. दरम्यान, या ठिकाणी सतत पाऊस पडत असल्याने बचाव कार्यात अडचणी आल्या.

केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह (Union Minister of State Jitendra Singh)यांनी या अपघातातील मृतांच्या कुटुंबियाप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. या अघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे. पोलीस, एसडीआरएफ आणि सिव्हिल क्यूआरटी घटनास्थळी पोहोचले आहेत. बचावकार्य सुरू आहे. मी सतत संपर्कात आहे, असे त्यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले.