जम्मू-काश्मीर : दोन घुसखोरांना कंठस्नान

0
जम्मू-काश्मीर : दोन घुसखोरांना कंठस्नान
jammu-and-kashmir-two-infiltrators-killed

जम्मू (Jammu)  09 सप्टेंबर  :-  जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर भारतीय जवानांनी घुसखोरीचा आणखी एक प्रयत्न हाणून पाडला आहे. जवानांनी घुसखोरी करणाऱ्या दोन जिहादी दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

यासंदर्भातील माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणा आणि जम्मू-काश्मीर (jammu and kashmir) पोलिसांना घुसखोरीची माहिती मिळाली होती, त्यानंतर एलओसीवर अलर्ट जारी करण्यात आला होता. सीमेवर सज्ज असलेल्या जवानांनी घुसखोरांना गोळ्या घातल्या. यावेळी या जिहादी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. आतापर्यंत 2 एके-47 रायफल आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. यापूर्वी 30 ऑगस्टल रोजी सैन्याने दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला होता. यावेळी सुरक्षा दलांनी विशेष मोहीम राबवून घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

केंद्रशासित प्रदेशाच्या निर्मितीनंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने राज्यातील 90 विधानसभा जागांसाठी मतदानाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. जम्मू-काश्मीरमधील जनता 18 आणि 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी आपले सरकार निवडण्यासाठी मतदान करेल.सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील केंद्रशासित प्रदेशात तीन टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. विधानसभा निवडणुकीचा निकाल 4 ऑक्टोबरला लागणार आहे. पहिल्या टप्प्यात 24 जागांवर, दुसऱ्या टप्प्यात २६ जागांवर आणि तिसऱ्या टप्प्यात 40 जागांवर मतदान होणार आहे.

Jammu university
Flights to Jammu
Jammu distance
Jammu district
Jammu University Result
Jammu News
Service Plus Jammu
Jammu neighborhoods