

जळगाव(jalgaon) 4 जून :- रावेर लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी सकाळी ८.३० वा.एमआयडीसी(MIDC)च्या शासकीय गोदामात मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या फेरीत भाजपचे दोन्ही उमेदवार आघाडीवर आहेत. तसेच दुसऱ्या फेरीत देखील रक्षा खडसे व स्मिता वाघ(smita wagh) आघाडीवर आहे.आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी सुमारे 46 हजार मतांची आघाडी घेतली आहे. तर रक्षा खडसे यांनी 61 हजार मतांची आघाडी घेतली आहे. या तुलनेत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पाटील आणि शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटील हे पिछाडीवर पडले आहेत.
जळगाव मतदारमधून स्मिता वाघ यांना आतापर्यंत 1,04,840 मते मिळाली आहे, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार करण पाटील यांना 58,420 मते मिळाली आहेत. रावेरमध्ये रक्षा खडसे(Rakdha Khadse) यांना 1,27,568 मते मिळाली आहेत, तर श्रीराम पाटील यांना 66 हजार 542 मते मिळाली आहेत. सुरुवातीच्या मतमोजणीत दोन फेऱ्यांमध्ये भाजपच्या जळगाव आणि रावेरमधील दोन्ही उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे.
रावेरमधून भाजपच्या रक्षा खडसे 73,839 मतांनी आघाडीवर गेल्या आहेत. आता हाही लीड तोडणे अवघड आहे. जळगावमधून भाजपाच्या स्मिता वाघ यांनी आधीच लाखाची आघाडी घेतली आहे. इतकी पिछाडी भरून काढून पुढे जाणे आता अवघड आहे.
राज्यात, देशात, उत्तर महाराष्ट्रात भाजपची दाणाफाण होत असताना जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागा टिकवून ठेवणाऱ्या जळगाव भाजपाचे, मंत्री गिरीश महाजन यांचे अभिनंदन करायलाच हवे.