मोठी बातमी: जीव वाचवण्यासाठी मारल्या उड्या; जळगावात 11 जणांचा रेल्वे अपघातात दुर्देवी मृत्यू!!

0

Jalgaon accident: 11 passengers jump out

💥 मोठी बातमी: जीव वाचवण्यासाठी मारल्या उड्या; जळगावात 11 जणांचा रेल्वे अपघातात दुर्देवी मृत्यू!!

At least 12 killed, many injured as train runs over passengers near Maharashtra’s Jalgaon

The incident occurred near the Pachora Railway Station in Jalgaon, where at least 12 passengers died after trying to disembark from the moving Pushpak Express due to a suspected fire

जळगावहून मुंबईकडे येत असलेल्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी गाडीमधून उड्या मारल्या. मात्र, दुर्दैवाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने या प्रवाशांना चिरडलं.

ही घटना गैरसमजामुळे घडली आहे. आग लागल्याची अफवा ऐकून प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. त्यावेळी दुसऱ्या बाजूने येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने त्यांना चिरडलं.

घटनेची माहिती मिळताच तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. जखमींना पाचोऱ्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.: जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्र सरकारला लवकरात लवकर मदत पुरविण्याची विनंती केली आहे.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून घटनास्थळी शोध आणि मदतकार्य जोरात सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांत राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.