शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जागल आंदोलन

0

 

यवतमाळ – आर्णी तहसील समोर काँग्रेसचे सरचिटणीस जितेंद्र मोघेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जागल आंदोलन सुरू आहे. या अनोख्या आंदोलनाची राजकीय पक्षांसह प्रशासनात जोरदार चर्चा सुरू आहे. शेतकरीवर्ग ज्या प्रकारे त्यांच्या शेतात शेतपीकाची जागल करून वन्यप्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करतात, अगदी त्याच प्रकारे सरकार आणि प्रशासनाला झोपेतून जागवण्यासाठी काँग्रेस कडून अनोखा आंदोलन करण्यात आले आहे. दरम्यान काँग्रेसच्या जागल आंदोलनाला शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाने पाठींबा दिला आहे.