आता 1500 रुपयांऐवजी 500 रुपये… लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट

0

लाडकी बहीण योजनेतील अटीनुसार एका सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या आठ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता कमी मिळणार असल्याचे समोर आले आहे.

नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या आठ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता 1500 रुपयांऐवजी 500 रुपये देण्यात येणार आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

‘सरकारने राज्यातील लाडक्या बहिणींना एप्रिल फूल बनवण्याचं काम केलं आहे. पहिल्या दिवशीपासून आम्ही सांगतोय की सरकार या योजना सुरू करतंय पण भविष्यात त्या बंद केल्या जातील. तर याच मार्गावर आता सरकार आहे. हळूहळू सरकारकडून तसे प्रयत्न सुरू असून कोणते न् कोणते निकष लावायचे आणि लाभार्थी महिलांची संख्या कशी कमी होईल, हे सरकारचं लक्ष्य आहे.’, असं म्हणत रोहिणी खडसेंनी सरकारवर निशाणा साधला आहे.