“आमचे ते बंड नव्हते..”, शरद पवारांचा दावा

0

(Pune)पुणे : “मी केलेले ते बंड नव्हते, तर आम्ही एकत्रितरित्या घेतलेला निर्णय घेतला होता”, असा असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केला आहे. शरद पवारांनी वयाच्या ३८ व्या वर्षी बंड केले होते व मी ते साठाव्या वर्षी केले, असे वक्तव्य अजित पवारांनी केले आहे. त्यावर बोलताना पवारांनी हा दावा केला. (Sharad Pawar on Ajit Pawar)

पवार म्हणाले, “आमच्या काळात आमचे बंड नव्हतेच, आम्ही बसून निर्णय घेतला होता. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मोठे नेते होते, त्यांची विचारधारा विचारात घेऊन आम्ही भूमिका घेतली होती. म्हणून त्याला आजच्यासारखे स्वरुप नव्हते, तो सर्वांनी एकत्र बसून घेतलेला निर्णय होता. त्यामुळे याबाबत तक्रार करायचं काही कारण नाही, असेही पवार म्हणाले.
वंचितचा समावेश व्हावा
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या इंडिया आघाडीतील समावेशाला राष्ट्रवादी काँग्रेस अनुकूल असल्याचे शरद पवारांनी म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीत समावेश व्हावा, असे मत काँग्रेसकडे व्यक्त करण्यात आल्याचे पवारांनी सांगितले.