लाॅयन्सच्या सेवा सप्ताहाचा शांतता रॅलीने शुभारंभ

0

 सर्व्हाईकल व्हॅक्सिन कॅम्पचे आयोजन

नागपूर (Nagpur),
दरवर्षी गांधी जयंती पासून सुरू होणाऱ्या लाॅयन्स क्लबच्या सेवा सप्ताहाला यंदाही नागपुरात शांतता रॅलीने प्रारंभ झाला. लाॅयन्स क्लब ऑफ नागपूरच्या वतीने तयार करण्यात आलेले ई-वेस्ट वाहन हे या रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले.
नागपूर येथील मुंजे चौकातून विविध घोषणा देत, गांधीजींच्या विचारांचा आणि सामाजिक विचारांचा प्रचार करणारे फलक हातात घेऊन लाॅयन्स क्लबचे पदाधिकारी रॅलीत सहभागी झाले होते.

क्लबचे अध्यक्ष सचिन अग्रवाल, सचिव विनोद गुप्ता, उमेश महतो, नितीन वर्मा, रवी किशनपुरिया, सुनील कुहीकर, किशोर कुंजेकर, सागर शिवहरे, विघ्नेश बिलसे, डॉ. शिरीष चांडक, रीतू गुप्ता, कोमल शिवहरे, खुशी चांडक आदी यावेळी उपस्थित होते.

या रॅलीचा समारोप बर्डीतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ पुतळ्याला‌ माल्यार्पण आणि अभिवादन करून झाला. तर याच सप्ताहाचा एक भाग म्हणून दुपारी अग्रसेन भवनात सर्व्हाईकल व्हॅक्सिन कॅम्पचेही आयोजन करण्यात आले होते. यात शंभराहून अधिक नागरिकांना तपासणी करून लस देण्यात आली.

लाॅयन्स क्लब चे डिस्ट्रिक्ट ॲक्टिव्हिटी चेअरमन विलास बुटले, पीजीडी बलबीरसिंह वीझ, अध्यक्ष सचिनजी अग्रवाल ,सचिव विनोदजी गुप्ता, कोषाध्यक्ष किशोर भैया, लायन रवि किशनपुरिया, भूतपूर्व अध्यक्ष लायन विजय फरकसे एवम भूतपूर्व अध्यक्षलायन संतोष जेजनी ,डॉक्टर शिरीष चांडक ,सागर शिवहरे, गुरसिमरन कौर शिवहरे आदी यावेळी उपस्थित होते.