
“ईश्वर करो, माझ्यावर निर्णय घेण्याची वेळ येऊ नये..”: पंकजा मुंडे
(Mumbai)मुंबई- (BJP leader Pankaja Munde)भाजपनेत्या पंकजा मुंडे पक्षावर नाराज असल्याची चर्चा असतानाच आता त्यांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा त्यांच्या राजकीय भूमिकेची चर्चा सुरु झाली आहे. (BJP Leader Pankaja Munde) “ईश्वर करो, माझ्यावर निर्णय घेण्याची वेळ येऊ नये”, असे सूचक विधान केले असून त्या काही वेगळा निर्णय घेणार की काय, याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलेली आहे.
अलिकडेच जीएसटी विभागाने परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर कारवाई केल्यामुळे त्यांच्या नाराजीत अधिकच भर पडल्याचे बोलले जात आहे. कारखान्याची सुमारे १९ कोटींची मालमत्ता जप्त केल्याची माहिती आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या इतर काही कारखान्यांना सरकारकडून मदत मिळाली, पण माझ्या कारखान्याला सरकारकडून मदत मिळाली नाही, अशी खंत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली होती. त्या आता (Union Home Minister Amit Shah)केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहेत. सध्या ते व्यस्त असल्यामुळे त्यांची भेट मिळालेली नाही, असे त्यांनी सांगितले. ईश्वर करो, माझ्यावर निर्णय घेण्याची वेळ येऊ नये, असेही त्या म्हणाल्या आहेत. मी या संघटनेत माझ्या वडिलांना पाहिले आहे. माझ्यासाठी हे वेगळे नाते आहे. त्यामुळे माझ्यासाठी असा निर्णय घेणे प्रचंड वेदनादायी असेल. त्यामुळे माझ्यावर असा कोणताही निर्णय घेण्याची वेळ येवू नये, अशी माझी प्रार्थना आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.