
मुंबई-अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची जोरदार तयारी सुरु असतानाच महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांना या सोहळ्याची निमंत्रण पाठविले गेली आहेत. २२ जानेवारीला होणाऱ्या सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह केंद्रीय मंत्री रामदास आठवले तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनाही या सोहळ्याचे निमंत्रण पाठविण्यात आल्याची माहिती आहे. (Ram Temple Inauguration Invitations)
राम जन्मभूमी न्यासाने निमंत्रण पत्रिका कुरिअर केल्या आहेत. त्यामध्ये या सर्व नेत्यांची नावे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्रात निमंत्रणावरुन वाद सुरु होता. काही नेत्यांना निमंत्रण दिले जाणार नाही, यावरुन माध्यमांमध्ये चर्चा सुरु होती. मात्र, ती चुकीची ठरली आहे.