२५० कोटींची गुंतवणूक ३०० जणांना रोजगार

0

वर्धा (Wardha) जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील हिंगणी गावात सुरू होत आहे. औषधीचे उत्पादन बल्क स्वरुपात वर्षभरात सुरू होईल. पहिल्या टप्प्यात २५० कोटींची गुंतवणूक आणि ३०० जणांना रोजगार देणार असल्याची, माहिती ‘इप्का’ लेबोरेटरीजचे (आयपीसीए) कार्यकारी अध्यक्ष प्रेमचंद गोधा यांनी दिली.

बोर्धरण बोर व्याघ्र प्रकल्प परिसरात हिंगणी येथे वर्धेतील पहिल्या ग्रीन युनिटमध्ये १५ मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प आणि १०० टक्के पॅलेटवर चालणारी बॉयलर प्रणाली असेल. यात कोळशाचा उपयोग करण्यात येणार नाही. पुढील वर्षी सौर ऊर्जा प्रकल्प सुरू होईल. बल्क औषध उत्पादनाच्या भविष्यासंदर्भात बोलताना गोधा यांनी भारताची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. ते म्हणाले, चीनने काही विशिष्ट औषधांच्या उत्पादनातून माघार घेतली असून या क्षेत्रात भारत आघाडीवर आहे. आम्ही या औषधांचे जगातील सर्वात मोठे उत्पादक आहोत. चीनमध्ये मलेरिया नाही, त्यामुळे ते या औषधांचे उत्पादन करत नाहीत, पण भारतात याची मोठी मागणी आहे. हे औषध यूएसएफडीए मंजूर केलेले एकमेव उत्पादन असून ते अमेरिकन लष्करालाही पुरवले जाते. या प्रकल्पात पुढे “क्लोरोक्विन” गोळ्या, इंजेक्शन्स आणि सिरपचे उत्पादन केले जाणार. एप्रिलपासून चाचणी उत्पादन सुरू होईल. साखर कारखान्यांमधून कच्चा माल गोळा करून उत्पादनासाठी वापरण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी इप्काने नोबल एक्स्पोकेम ही ७०० एकरातील बंद पडलेली कंपनी खरेदी केली. पहिल्या टप्प्यात १०० एकर जागेचा, नंतर पूर्ण जागेचा उपयोग करण्यात येणार आहे.

वर्धा:- औषध उत्पादनाचे पहिले ग्रीन युनिट

स्थानिक एफडीएच्या मान्यतेनंतर उत्पादनाला सुरुवात होणार. कंपनी सुरुवाती पासूनच नवीन ऊर्जा पर्यायांचा अवलंब करत आहे. रतलाम येथील प्लांटमध्ये सौर प्रकल्प कार्यान्वित आहे.

पॅलेट आधारित इंधन प्रणाली वर्षभरापासून वापरली जात आहे. वर्धेतील हा प्रकल्प विदर्भातील पहिली मोठी गुंतवणूक आहे फार्मा क्षेत्राला सतत विज्ञान शाखेतील पदवीधरांची गरज असते. उत्पादन हे २४ तास न थांबता सुरू राहते. कंपनीच्या “झिरोडॉल” या अर्थरायटिसच्या औषधासाठी आणि “लॅरिएगो” या मलेरियाच्या औषधासाठी जागतिक स्तरावर मोठी मागणी आहे. अर्थरायटिसच्या वेदना कमी करणाऱ्या औषधांसाठी इफका जगातील पहिल्या क्रमांकाची कंपनी आहे. प्रेमचंद गोधा यांच्या वर्धेतील प्रकल्पामुळे भारताचा बल्क औषध उत्पादनातील वर्चस्व आणखी मजबूत होईल.