
नागपूर – जम्मू काश्मीरमधील दहशतवादी संघटनांशी संबंधित अफसर पाशाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धमकी प्रकरणात बेळगाव येथून नागपूर पोलिसांनी प्रोडक्शन वारंटवर नागपुरात आणले आहे. अफसर पाशा हा चार दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे. प्रथमदर्शनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खंडणी प्रकरणात जयेश पुजारी आणि अफसर पाशा या दोघांचा कटात सहभाग असल्याचे समोर आले आहे. तपासा दरम्यान पाशाचा पीसीआर वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तसेच गरज पडल्यास पहिला आरोपी जयेश पुजारीला सुद्धा पुन्हा पीसीआरमध्ये घेऊन दोघांची एकत्र विचारपूस करून तपास केला जाईल. या प्रकरणात दोघांचाही कटात सहभाग होता हे समोर आले आहे. यात अफसर पाशा हा काही वर्षांपूर्वी नागपुरात एकापेक्षा अधिक वेळा येऊन गेला होता. तो नागपुरात आला होता अशीही माहिती समोर येत आहे. पोलिस यासंदर्भात विस्तृत माहिती घेत आहेत. नागपुरात काही लोकांशी पाशाचा संपर्क होता यामुळे तपासात आणखीही काही आरोपी होऊ शकतील अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. मधल्या काळात एनआयएकडे तपास हस्तांतर केल्यास ते पुढील निर्णय घेतील. याविषयी बेळगाव येथे पथक जाऊन आले आहे.बेळगाव येथील कारागृहातील आरोपीची विचारपूस झाली आहे. यात अधिक वतपास सुरू आहे. अनेक स्टेट एजन्सी मिळून तपास करीत असून पथक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तपास करत असल्याचे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.