रामदेवबाबा विद्यापिठात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

0

नागपुर(Nagpur) :- रामदेवबाबा विद्यापिठात आंतरराष्‍ट्रीय योग दिन थाटात साजरा करण्‍यात आला. विद्यापिठाच्‍या इएन ऑडिटोरियममध्‍ये योग अभ्यासक व माजी विद्यार्थी मयंक जैन व योगतज्‍ज्ञ देवयानी दिनकर डोंगे यांची विशेष उपस्थिती होती.

या वर्षीची आंतरराष्‍ट्रीय योग दिनाचा संकल्‍पना महिला सक्षमीकरण, जगभरातील महिलांच्या शक्ती, लवचिकता आणि आंतरिक सौंदर्याला वंदन करणे ही होती. त्‍याअनुषंगाने मयंक जैन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तर देवयानी दिनकर डोंगे यांनी ज्ञान आणि अनुभवाचा खजिना खुला केला. त्‍यांनी शारीरिक लवचिकता, मानसिक स्पष्टता आणि आध्यात्मिक सुसंवाद वाढविण्यासाठी डिझाइन केलेल्‍या विविध योगासनांचे यावेळी प्रात्‍यक्षिक सादर केले. कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचा-यांनी सहभाग नोंदवला.